माणसाला उपयुक्त असणाऱ्या किटकांमध्ये मधमाशीचा समावेश होतो. निसर्गाचा समतोल राखण्यासाठीही मधमाशी महत्वाची भूमिका बजावत असते. मधमाशीवर अनेक वर्षे संशोधन केलेल्या डॉ. क. कृ. क्षीरसागर यांनी ‘संशोधन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मधमाशीबद्दल सोप्या शब्दांत शास्त्रीय माहिती दिली.