ऑक्टोबर २०२० मध्ये खगोलशास्त्रात तीन महत्वाच्या घटना नोंदल्या गेल्या. नासाच्या सोफीया या हवाई वेधशाळेला चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागामध्ये पाण्याचा शोध लागला. नासातर्फेच बेन्नू या लघुग्रहावरील माती आणि खडे जमा करण्याचा यशस्वी प्रयोग पार पडला. आणि गुरुत्वीय लहरींच्या नव्या ३९ घटनांची नोंद शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने नुकतीच जाहीर केली. या शोधांबाबत अधिक माहितीसाठी विज्ञान वार्ताचा दुसरा भाग नक्की पाहा. विज्ञान जगतातील घडामोडी मराठीत जाणून घेण्यासाठी संशोधनचे ‘मराठी विज्ञान’ चॅनल नक्की सबस्क्राईब करा.