Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
  • Coordinator – Editor
  • Upcoming Events
Menu

मॉन्सून हंगामात एल निनोची शक्यता नाही

Posted on April 13, 2025April 13, 2025 by sanshodhanindia

संशोधन, १३ एप्रिल, २०२५

————–   

भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या आधी अमेरिकेच्या नॅशनल ओशिओनीक अँड अॅटमॉस्फेरीक अॅडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेच्या वतीने जगभरातील १६ मॉडेलच्या आधारे प्रशांत महासागरातील स्थितीचा दीर्घकालीन अंदाज देण्यात आला आहे. या अंदाजानुसार, प्रशांत महासागरात गेले काही महिने सक्रिय असलेली ला निना स्थिती जाऊन न्यूट्रल स्थिती तयार झाली असून, आगामी मान्सूनच्या काळात एल निनोची स्थिती तयार होणार नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ झाली असून, तेथील तापमान सध्या सर्वसाधारण पातळीच्या दरम्यान नोंदले जात आहे. या स्थितीला न्यूट्रल स्थिती म्हटले जाते. 

सीपीसीच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती उत्तर गोलार्धाच्या उन्हाळ्यापर्यंत (मार्च ते सप्टेंबर) कायम राहण्याची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यानंतर काही मॉडेलनुसार हिवाळ्याच्या सुरुवातीला प्रशांत महासागरात न्यूट्रल किंवा ला निना स्थिती येऊ शकते. मात्र, एल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता फक्त २० टक्के आहे. 

सीपीसीने जाहीर केलेल्या अहवालानुसार आगामी मान्सून काळात भारतातील पर्जन्यमानावर प्रतिकूल प्रभाव टाकू शकणारा एल निनो हा एक मुख्य घटक सक्रिय नसल्याचा फायदा हंगामी पावसाला होऊ शकतो. 

प्रशांत महासागरातील तापमान मान्सूनसाठी प्रतिकूल नसल्याचा अंदाज आला असला तरी, हिंदी महासागरातील तापमान कसे राहते यावरही यंदाचा मान्सून कसा राहील हे अवलंबून असेल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्व हिंदी महासागराचे (जावा, सुमात्रा बेटांजवळील) तापमान सरासरीपेक्षा कमी असेल तर या स्थितीला ‘पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) म्हणतात. या स्थितीत अरबी समुद्राचे तापमान तुलनेने जास्त राहून भारतात चांगला पाऊस पडतो. या उलट आफ्रिकेजवळील हिंदी महासागराचे तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले गेल्यास पूर्व हिंदी महासागराचे तापमान जास्त राहून भारतात कमी पाऊस पडतो. या स्थितीला ‘निगेटिव्ह आयओडी’ म्हणतात.        

————————

वर्ष———–मान्सूनचे पर्जन्यमान————-मान्सून काळातील एल निनो/ ला निना / न्यूट्रल स्थिती    
२०२०———१०९ टक्के——————————न्यूट्रल + ला निना  

२०२१———९९ टक्के——————————–न्यूट्रल + ला निना    

२०२२———१०६ टक्के——————————-ला निना  

२०२३———-९४ टक्के——————————-एल निनो   

२०२४———-१०८ टक्के——————————न्यूट्रल           
————————-

Please follow and like us:
error
fb-share-icon
Tweet
fb-share-icon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=vXUQKGHAPkk

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2025 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme