हिरव्या रंगाचे लोणार सरोवर जून २०२० मध्ये एकाएकी गुलाबी रंगाचे झाल्यानंतर सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. लोणारचे पाणी गुलाबी रंगाचे होण्यामागील शास्त्रीय कारण काय असावे, याबद्दल ‘टीम संशोधन’ने ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत डॉ. शौचे यांनी खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचा रंग बदलण्यामागील शास्त्रीय कारणे सांगितली. लोणार बाबतीत असेच काहीसे घडले असण्याची दाट शक्यता आहे. डॉ. शौचे हे स्वतः गेली दोन दशके लोणारच्या पाण्यातील सूक्ष्मजीवांवर संशोधन करीत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=tb-WYlNhf84&feature=youtu.be
Please follow and like us: