मयुरेश गि. प्रभुणे
परिचय:
– विज्ञान पत्रकार, महाराष्ट्र टाइम्स
– समन्वयक- संपादक, sanshodhan.in
– सचिव, सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस)
– अभ्यागत व्याख्याता (Guest Lecturer), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग (रानडे इन्स्टिट्यूट)
Contact: 9922929165 Email: mayureshscience@gmail.com
Facebook: https://www.facebook.com/ramayuresh
Twitter: https://twitter.com/mayureshgp
Instagram: https://www.instagram.com/mayureshgp/
अनुभव-
१) गेली २३ वर्षे विज्ञान- तंत्रज्ञान विषयात लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स आदी वृत्तपत्रांतून आणि अनुभव या मासिकातून लेखन. गेली १८ वर्षे विज्ञान पत्रकारिता. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वार्तांकनात विज्ञान अभ्यासक म्हणून सहभाग. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारीता अभ्यासक्रमामध्ये ‘विज्ञान पत्रकारीता’ या विषयी अध्यापन.
२) खगोलशास्त्र, अवकाशशास्त्र, हवामानशास्त्र हे विशेष अभ्यासाचे विषय
३) गेली १७ वर्षे भारतीय अवकाश कार्यक्रमावर विशेष अभ्यास. इस्रोच्या अवकाशयानांच्या उड्डाणांचे वार्तांकन करण्यासाठी नियमितपणे श्रीहरिकोटाला भेट. या उड्डाणांचे मराठी माध्यमासाठी सर्वप्रथम लाईव्ह वार्तांकन. भारताच्या चांद्रमोहिमेचा आणि मंगळ मोहिमेचा अभ्यास, सर्व प्रमुख अवकाश शास्त्रज्ञांच्या मुलाखती.
४) ‘खगोल विश्व’ संस्थेद्वारे राज्यभरात गेली २४ वर्षे खगोल आणि विज्ञान प्रसाराचे कार्य.
५) विद्यार्थी, शिक्षकांसाठी खगोलशास्त्र, अवकाशशास्त्रावरील अभ्यासक्रम आणि कार्यशाळांचे आयोजन. एक हजाराहून अधिक आकाशनिरीक्षकांना प्रशिक्षण.
६) पिंपरी चिंचवड सायन्स काँग्रेस आणि पुणे सायन्स फिल्म फेस्टिव्हलची सुरूवात.
७) सेंटर फॉर सिटिझन सायन्सच्या माध्यमातून विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना विज्ञान संशोधनात प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न. त्याअंतर्गत सध्या विविध क्षेत्रांतील १०० विद्यार्थी आणि नागरीक पुण्यातील नामवंत संशोधन संस्थांसोबत संशोधन प्रकल्प करीत आहेत.
८) दरडींची एक दिवस आधी पूर्वकल्पना देणाऱ्या ‘सतर्क’ या सुविधेसाठी पुढाकार. हवामानावर आधारीत सतर्कचे देशातील पहिलेच मॉडेल असून, २०१५ – २०१८ च्या मॉन्सूनमध्ये त्याची उपयुक्तता सिद्ध झाली. २०२२ मध्ये सतर्कचे संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नल – ‘लँड’मध्ये प्रकाशित झाले.
९) मॉन्सूनच्या सर्वंकष अभ्यासासाठी ‘प्रोजेक्ट मेघदूत’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची २०११ मध्ये निर्मिती. भारतातील विविध प्रांत आणि मॉन्सून यांच्यातील परस्परसंबंधावर संशोधन. मॉन्सूनचा विविध प्रदेशांतून मागोवा घेताना सुमारे एक लाख किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास.
प्रोजेक्ट मेघदूत अंतर्गत –
– महाकवी कालिदासाच्या मेघदूत या काव्यातील विज्ञानाचा शोध
– प्राचीन सरस्वती नदीच्या मार्गावरून प्रवास करून तिच्या सद्यस्थितीचा आढावा. त्यातून सरस्वतीसंबंधी तीन महत्वाची निरीक्षणे.
– गंगेच्या समुद्रमिलनापासून उगमापर्यंत मॉन्सूनचा मागोवा. ‘भारतीय संस्कृतीच्या विकासात मॉन्सून आणि हिमालयाचे योगदान’ या संबंधी महत्वाची निरीक्षणे.
– पहिल्या भारतीय मॉन्सून कोशाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील. मॉन्सूनवर आधारीत जीवन आणि अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतासाठी हा कोश कायमस्वरूपी उपयुक्त ठरेल.
——-
व्याख्यानांचे विषय
१) इस्रोची यशोगाथा: इस्रोच्या स्थापनेपासून चांद्रयान ३ पर्यंतच्या प्रवासाचे कथाकथन(कालावधी २ तास)
२) विश्वाची गोष्ट: विश्वाच्या निर्मितीपासून सध्याच्या काळापर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींचा इतिहास (कालावधी २ तास)
३) मॉन्सून- भारताचा आत्मा: मॉन्सूनसोबतच्या दशकभराच्या प्रवासाचा अनुभव (कालावधी २ तास)
४) तीव्र हवामानाच्या घटना: चक्रीवादळे, पूर, दरडी, गारपीट, अतिवृष्टी आदी घटनांची कारणे, नुकसान कमी करण्याचे उपाय (कालावधी १ तास)
५) ओळख विश्वाची: विश्वातील विविध घटक, घटनांची ओळख (कालावधी २ तास)
६) ओळख खगोलशास्त्राची: प्राचीन काळापासून २१ व्या शतकापर्यंतचा खगोलशास्त्राचा प्रवास, खगोलशास्त्रातील महत्वाचे शोध, शास्त्रज्ञांचे कार्य, खगोलशास्त्रीय प्रकल्प (कालावधी २ तास)
७) विज्ञान स्वयंसेवक/ सिटीझन सायन्स: नागरिक आणि शास्त्रज्ञांच्या समन्वयातून विज्ञान संशोधन (कालावधी १ तास) ८) लोणार- भारताचा अद्भुत वारसा: लोणारचे खगोलशास्त्रीय, भूशास्त्रीय, जैवशास्त्रीय, ऐतिहासिक महत्त्व (कालावधी १ तास)
९) धूमकेतू, लघुग्रह, उल्का: सूर्यमालेतील लघु आकाराच्या घटकांचे स्वरूप, महत्त्व, पृथ्वीला धोका ( कालावधी १ तास)
१०) खगोलशास्त्रीय घटना: ग्रहणे, उल्कावर्षाव, पिधाने आदी घटनांची शास्त्रीय आणि मनोरंजक माहिती (कालावधी १ तास)
————————-
एकदिवसीय कार्यशाळा
१) आकाश निरीक्षण आणि खगोलशास्त्रीय कार्यशाळा: व्याख्याने, आकाश निरीक्षण (कालावधी ८ तास)
२) हवामानशास्त्रीय कार्यशाळा: व्याख्याने, मॉडेल मेकिंग (कालावधी ५ तास)
३) अवकाशशास्त्रीय कार्यशाळा: व्याख्याने, मॉडेल मेकिंग (कालावधी ५ तास)