पृथ्वीपासून २६ कोटी प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या एका दीर्घिकेभोवती (गॅलेक्झी) फिरणाऱ्या महाकाय वायुरूपी कडीचा शोध पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सच्या (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी लावला आहे. नारायणगाव जवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (जीएमआरटी) वापर करून सिंह राशीतील एजीसी २०३००१ या दीर्घिकेभोवती न्यूट्रल हायड्रोजनच्या महाकाय कडीचे अस्तित्व शास्त्रज्ञांना आढळून आले. मात्र, सूर्याच्या तब्बल दोन अब्ज पट वस्तुमान असूनही या हायड्रोजनच्या ढगामध्ये ताऱ्यांची निर्मिती होत नाही हे विशेष.
Please follow and like us: